Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्या सिद्धार्थला म्हणते,‘झंपानो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 12:57 IST

हरहुन्नरी कलाकार विद्या बालन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ रॉय कपूर यांची जोडी ‘बी टाऊन’च्या सर्वात प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. ...

हरहुन्नरी कलाकार विद्या बालन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ रॉय कपूर यांची जोडी ‘बी टाऊन’च्या सर्वात प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या लग्नाला चार वर्षे झाली तरी ते दोघे एकमेकांसोबत ‘मेड फॉर इच अदर’ च वाटतात. पण, लग्नाला एवढी वर्षे झाली तरी विद्या सिद्धार्थला कोणत्या नावाने बोलावते, तुम्हाला माहितीये का? ‘झंपानो’ या नावाने ती त्याला घरात आवाज देत असते. इटालियन चित्रपट ‘ला श्ट्राडा’ मध्ये एक कॅरेक्टर आहे ज्याचे नाव ‘झंपानो’ आहे. तुम्हाला नवल वाटेल पण, तिने तिच्या मोबाईलवरही सिद्धार्थचे नाव ‘झंपानो’ या नावानेच सेव्ह केले आहे. याविषयी बोलताना ती म्हणते,‘मला जानू, बेबी, हबी आणि इतर अशी नावं मला ठेवायला आवडत नाहीत. मी लेटेस्ट जे चित्रपट पाहिले त्यातीलही नावं मी सिद्धार्थसाठी वापरत असते.’ ‘द नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनींग अ‍ॅक्ट्रेस’ ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘कहानी २’ साठी चर्चेत आहे. कहानी चित्रपट तिच्यासाठी खऱ्या अर्थाने लकी ठरलाय. प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘कहानी २’ लाही कहानीपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळेल, अशी तिची अपेक्षा आहे.