Join us

विद्या बालनच्या कारला अपघात... पण सुदैवाने थोडक्यात बचावली तुम्हारी 'सुलु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 16:56 IST

बॉलिवूड अभिनेत्री  विद्या बालनच्या कारला नुकताच मुंबईतल्या वांद्रे इथे अपघात झाला. विद्या बालन मीटिंगसाठी एक ठिकाणी जात असताना हा ...

बॉलिवूड अभिनेत्री  विद्या बालनच्या कारला नुकताच मुंबईतल्या वांद्रे इथे अपघात झाला. विद्या बालन मीटिंगसाठी एक ठिकाणी जात असताना हा अपघात घडला. विद्याच्या कारला दुसऱ्या एक कारने जोरदार टक्कर दिली यात विद्याच्या कारची चांगलीच दुर्दशा झाली आहे. पण या अपघातातून विद्या थोडक्यात बचावली आहे. मात्र कारचे बरेच नुकसान झाले आहे. विद्या बालनने नुकतेच चित्रपट 'तुम्हारी 'सुलु' चे शूटिंग पूर्ण केले आहे. यात ती एका  रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे.  विद्या जवळजवळ १० वर्षांनी पुन्हा एकदा रेडिओ जॉकीची भूमिका  साकारते. या आधी ती 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये रेडिओ जॉकी म्हणून दिसली होती. तुम्हारी सुलुमध्ये ती एका हाऊस वाईफ म्हणून सुद्धा दिसणार आहे. विद्या बालनचा 'तुम्हारी सुलु' हा चित्रपट आधी २४ नोव्हेंबर ला रिलीज होणार होता पण आता तो १डिसेंबर ला रिलीज होणार आहे.  पुन्हा एकदा विद्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे तिला पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्साह चे वातावरण आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे ३ पोस्टर आणि १ टीजर  रिलीज झाला आहे आणि याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हारी सुलू या चित्रपटाची कथा सुलु या स्त्रीच्या अवतीभवती फिरणार आहे. सुलु ही व्यक्तिरेखा विद्या बालन साकारणार असून ती या चित्रपटात आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सुलु रात्रीच्या शोंचे सूत्रसंचालन करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हारी सुलु या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेदी करत असून या चित्रपटात नेहा धुपिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  ALSO READ : विद्या बालनला निर्मात्याने समजले ‘पनवती’; मागितली चक्क जन्मपत्रिका!!चित्रपटाची रिलीज का पुढे ढकलण्यात या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कदाचित अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा चित्रपट 102 नॉट आऊटसोबत क्लैश होत होती म्हणून पुढे ढकलण्यात आली असावी. असा अंदाज लावण्यात येतो आहे. यात अमिताभ बच्चन 102 वर्षाच्या पित्याची भूमिका साकरतायेत. तर ऋषी कपूर 75 वर्षीय मुलीच्या भूमिकेत झळकणार आहेत.