Join us

विद्या बालनच्या 'बेगम जान'चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:43 IST

एकापेक्षा एक दर्जेदार परफॉर्मन्स देऊन आपल्या अभिनयाची छाप सोडलेली विद्या बालन पुन्हा एकदा पडद्यावर एका वेगळ्या रुपात आपल्यासमोर येण्यास तयार आहे. या चित्रपटाची कथा एका कोठ्याच्या विभाजनाच्या आधारित आहे ज्या कोठ्याचे विभाजन भारत पाकिस्तानच्या बॉर्डरच्या मध्ये होते. या कोठ्याची मालकीण विद्या बालन आहे. विद्या इथे तिच्या काही मुलींसोबत राहत असते. ती या सगळ्या मुलींना घेऊऩ आपले घर (कोठा) वाचवण्यासाठी संघर्ष करते. विद्याचे म्हणणे असते ती भिखाऱ्यांसारखी नाही राणी सारखी आपल्या महलात मरणार.

बेगम जान या मल्टीस्टारर चित्रपटात नसीरुद्धीन शाह, आशीष विद्यार्थी, गौहर खान आणि  इला अरुण असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहे. .ट्रेलरमध्ये सगळे कलाकार आकर्षित दिसातयेत. चंकी पांडेला तर तुम्ही ओळखीच शकत नाही. चंकी पांडे आपल्या करिअरमधल्या सगळ्यात वेगळ्या लूकमध्ये दिसतो आहे. स्त्रीजीत मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट बंगाली सिनेमा राजकहिनीचा रिमेक आहे. राजकहिनीचे दिग्दर्शन ही स्त्रीजीतने केले होते. बेगम जान 14 एप्रिला प्रदर्शित होणार आहे.     या चित्रपटात तुम्हाला काही शिव्या ही ऐकू येतील. जे शब्दांवर सेंसर बोर्ड नेहमी कात्री लावते या चित्रपटाच्या बाबतीत मात्र असे झालेले दिसत नाही आपल्याला. यावर चित्रपटाचा दिग्दर्शक स्त्रीजित मुखर्जी ही हैराण आहे. याचित्रपटातील विद्या बालनचा अभिनया हा तिच्या करिअरमधला आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा सगळ्यात जास्त बोल्ड आहे. विद्या बालन आपल्या अभिनयासाठी आतापर्यंत 3 फिल्मफेअर अॅवॉर्ड जिंकले आहेत. या चित्रपटातील तिचा अभिनया पाहून तुमच्या शरीरावर काटे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.