दरम्यान विद्याच्या ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला. बेमग जान फ्लॉप झाल्यानंतर विद्याला एक हिट चित्रपटाची गरज होती. सुलु साकारताना विद्याने कुठलीही आक्रमकता न दाखविता ही भूमिका सहज साकारली होती. प्रेक्षकांना तिची ही भूमिका चांगलीच पसंतीस आली. अतिशय सामान्य कथा असलेल्या या चित्रपटात विद्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले.
ALSO RAED : या कारणामुळे कमनशिबी म्हणून हिणवण्यात आले होते विद्या बालनलाJust signed the contract for movie rights for my book "Indira, India's Most Powerful PM" with @vidya_balan and @roykapurfilms! Utterly elated!! Look fwd to seeing INDIRA on screen! @juggernautbooks#IndiraTheMovie— Sagarika Ghose (@sagarikaghose) January 10, 2018
विद्याच्या ‘तुम्हारी सुलु’ला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे विद्या भलतीच खूश झाली होती. तिने मुलाखतीदरम्यान सांगितले की, या अगोदर मी जे चित्रपट केले होते ते कदाचित प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत. मात्र ‘तुम्हारी सुलु’चे यश माझ्यासाठी व्यक्तिगतरीत्या अभिमानास्पद आहे.