रांगेत अनेक चाहते सेल्फीसाठी ताटकळत उभे असताना काही जण रणवीरसोबत अनेकदा सेल्फी घेताना वा व्हिडिओ काढताना दिसले. हे पाहून रणवीर संतापला आणि त्याने अशांना अगदी धक्का देत बाजूला केले. एकाला तर रणवीर अगदी हात पकडून बाजूला करत असल्याचे या व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतेय.
ALSO READ : प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार?
तूर्तास रणवीर ‘गली बॉय’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग धडाक्यात सुरु आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो अलीकडे लिक झाले होते. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटातही रणवीरची वर्णी लागली आहे. यात तो पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारणार आहे.