Join us  

Video : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा भांगडा पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 7:56 AM

​चित्रपटा ‘बागी2’ चित्रपटाच्या एका गाण्यात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी भांगडा करताना दिसतायेत. या चित्रपटातील 'मुंडेया तों बच के' या गाण्यावर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी भांगडा करतायेत.

चित्रपटा ‘बागी2’ चित्रपटाच्या एका गाण्यात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी भांगडा करताना दिसतायेत. या चित्रपटातील 'मुंडेया तों बच के' या गाण्यावर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी भांगडा करतायेत. गेल्या महिन्यात  मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये  दोघांनी या गाण्याचे शूट केले. अहमद खान या गाण्याबाबत सांगताना म्हणाला की,  प्रत्येक पंजाबी गाण्यात एक नव रुप पाहायला मिळते. काला चश्मा, तेरी तो, तेरी तो, हमेशा याद सतावे' सारखी गाण्यांच्या आधी रिलीज झालेले 'मुंडिया तों बच के' हे गाणं पंजाबी गाण्याची शान आहे. त्यामुळे मी याला रिक्रिएट करण्याचा निर्णय घेतला.   ‘बागी2’च्या ट्रेलरमध्ये टायगरचा अ‍ॅक्शन अवतार बघण्यासारखा आहे. याशिवाय दिशा अन् टायगरचा रोमान्सही डोळ्यांत भरणारा आहे. मनोज वाजपेयी, रणदीप हुड्डा यांची एक झलकही या ट्रेलरमध्ये दिसते आहे. टायगरची एक एक किक, एक एक पंच पाहण्यासारखा आहे. टायगरचे चाहते असाल तर हा ट्रेलर तुम्ही न चुकवलेलाच बरा. ‘बागी2’ हा चित्रपट येत्या ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. पण  ‘बागी2’ श्रद्धाची जागा दिशाने घेतली. टायगर आणि  दिशा पटनीसोबतचा यात मनोज वाजपेयी, रणदीप हुड्डा हेही या चित्रपटात दिसणार आहेत. ‘बागी’ हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता.  ‘बागी2’ मात्र अहमद खानने दिग्दर्शित केला आहे.  ‘बागी2’मध्ये टायगर श्रॉफ व त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हे दोघे प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. कॉलेजपासून सुरू होणाºया या लव्हस्टोरीत अनेक टिष्ट्वस्टही बघायला मिळणार आहे. टायगरऐवजी दिशाचे  दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो, असे याचे कथानक असल्याचे कळतेय.