Join us  

video: "सुनाई दे रहा है, बहरा नहीं हूं मैं…" पुरस्कार सोहळ्यात रणबीर करण जोहरवर ओरडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 8:13 PM

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Ranbir Kapoor Karan Johar: अभिनेता रणबीर कपूरच्या Animal चित्रपटातील गाणी आणि संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चित्रपटाच्या एका सीनची खूप चर्चा झाली, ज्यामध्ये रणबीरचे पात्र आपल्या वडिलांवर, म्हणजेच अनिल कपूरवर रागात ओरडतो आणि म्हणतो, "सुनाई दे रहा है, बहरा नहीं हूं मैं." चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा सीन चांगलाच व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर रील्सही काढले. आता या दृश्याची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे.

नुकताच फिल्ममेयर पुरस्कार सोहळा झाला, ज्यात सर्व बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण जोहर आणि आयुष्मान खुराना या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. व्हायर लव्हिडिओमध्ये दोघेही स्टेजवरुन समोरच्या रांगेत बसलेल्या रणबीरसमोर येतात आणि रणबीरला डिवचण्याचा प्रयत्न करतात. करणचे शब्द ऐकून रणबीर संतापतो आणि अॅनिमल चित्रपटातील डायलॉग बोलतो. मूळात हा सर्व मनोरंजनाचा एक भाग होता. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अॅनिमलची दमदार कामगिरी21 डिसेंबर रोजी ॲनिमल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आणि जगभरात 917 कोटींची कमाई केली. या चित्रपटात रणबीर आणि अनिल कपूर व्यतिरिक्त बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरीसारखे स्टार्स आहेत. रणबीरसोबतच बॉबीनेही या चित्रपटाद्वारे छाप पाडली. आता हा चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. 26 जानेवारीपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होत आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरकरण जोहरबॉलिवूडफिल्मफेअर अवॉर्डसोशल व्हायरल