Join us

सोहा अली खानच्या बेबी शॉवरचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल, तुम्हीही पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 20:55 IST

सोहाच्या बेबी शॉवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या गर्भवती असून, हे सुखद क्षण आपल्या परिवारासोबत एन्जॉय करीत आहे. काही दिवसांपूर्वीच सोहाचा बेबी शॉवर काही मित्र आणि परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी सोहाची वहिनी करिना कपूर-खान, करिष्मा कपूर आणि कोंकणा सेन शर्मा, नेहा धुपिया आणि इतर काही क्लोज फ्रेंड्स उपस्थित होते. बेबी शॉवर सेरेमनीचे बरेचसे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र आता याच कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, ज्यात करिना, करिष्मा, कोंकणासह इतर क्लोज फ्रेंड एन्जॉय करताना बघावयास मिळत आहेत. यावेळी व्हिडीओमध्ये सोहा केक कापतानाही दिसत आहे. सोहाच्या बेबी शॉवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्यक्रमातील आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर धूम उडवित आहे. ज्यामध्ये सोहा तैमूरसोबत दिसत आहे. फोटोमध्ये तैमूर अतिशय निरागसपणे आत्या सोहाकडे बघत असताना दिसत आहे. सोहाने स्वत:च तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो अपलोड केला आहे. {{{{facebook_video_id####https://www.facebook.com/InstantBollywood1/videos/1581033591961046/">सोहाची वहिनी करिना कपूर गर्भवती असताना सातत्याने लाइमलाइटमध्ये राहत असे. आता तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सोहादेखील प्रयत्न करीत असताना दिसत आहे. कारण हा कार्यक्रम झाल्यानंतर सोहाने लगेचच बेबी बम्प दाखवित योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. तिचे हे फोटो सध्या तिच्या चाहत्यांना प्रचंड भावत असतानाचे दिसत आहे. खरं तर करिनाप्रमाणे सोहादेखील तिची प्रेग्नंसी पीरियड अतिशय स्टायलिश अंदाजात एन्जॉय करीत आहे. त्यासाठी ती सोश्ल मीडियाचा आधार घेत आहे.