Join us  

VIDEO : नेहमी अदबीनं वागणारी सारा अली खान अचानक फोटोग्राफरवर संतापली, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:01 PM

Sara Ali Khan VIDEO : अभिनेत्री सारा अली खान  तिच्या विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. विशेषत: मीडियासोबत ती अतिशय अदबीनं वागताना दिसते. पण काल असं काही घडलं की, सारा अली संतापली.

अभिनेत्री सारा अली खान ( Sara Ali Khan )  तिच्या विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. विशेषत: मीडियासोबत ती अतिशय अदबीनं वागताना दिसते. पण काल असं काही घडलं की, सारा अली संतापली. सध्या साराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत सारा फोटोग्राफर्सवर संतापल्याचं पाहायला मिळतंय. आता असं काय घडलं की सारा संतापली? तर त्यासाठी तुम्हाला बातमीसोबत दिलेला हा व्हिडीओ बघावा लागेल. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Sara Ali Khan lashes out at the Paparazzi )

तर सारा आपल्या एका नव्या प्रोजेक्टच्या सेटवरून बाहेर पडते. तिला पाहताच, तिथे हजर पापाराझी तिचे फोटो घेण्यासाठी अक्षरश: तुटून पडतात. यादरम्यान एका फोटोग्राफरचा साराला धक्का लागतो आणि यानंतर सारा घाईघाईत आपल्या कारमध्ये बसते. पापाराझी तिला फोटो देण्याची विनंती करतात. पण रागात असलेली सारा त्यांना नकार देते. ‘फिर आप लोग धक्का मारने लगते है...,’ असं ती म्हणते आणि गाडीतून बसून निघून जाते.

साराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला सपोर्ट केला आहे. ‘पापाराझी खरोखर कधीकधी अतिरेक करतात आणि मग सेलिब्रिटी संतापतात,’अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. ‘ती तरीही विनम्र वागली, ती खूप गोड आहे,’अशी प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली आहे. अनेकांनी सारा खूप विनम्र असल्याचं म्हणत तिचं कौतुक केलं.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अलीकडे तिचा ‘अतरंगी रे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. यात अक्षय कुमार व धनुष लीड रोलमध्ये होते. सध्या साराकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात सारा झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यात ती विकी कौशलसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय नखरेवाली, गॅसलाइट आणि इ इम्मॉर्टल आॅफ अश्वत्थामा या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूड