Join us

सलमान खानचा सिनेमा 'सिकंदर'च्या सेटवरुन लीक झाला व्हिडीओ, रश्मिका मंदानाची दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:25 IST

Salman Khan : सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट २०२५ साली ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी त्याच्या कामामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. 'सिंघम अगेन'मधला त्याचा कॅमिओ आणि रोहित शेट्टीसोबतचा त्याचा आगामी प्रोजेक्टमुळे चाहते खूश आहेत. त्याचवेळी तो त्याचा आगामी सिनेमा 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता सेटवरून काही फोटो लीक झाली आहेत, जी व्हायरल झाली आहेत.

सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट २०२५ साली ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मागील बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप असल्याने, तो २०२४ मध्ये पडद्यावर दिसला नाही. तो फक्त 'सिंघम अगेन'मध्ये दिसला आणि तोही काही सेकंदांसाठी. आता तो हैदराबादमध्ये असून तिथे चित्रपट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

'सिकंदर'च्या सेटवरून लीक झाला व्हिडिओआता सिकंदरच्या सेटवरील एक व्हिडिओ ट्विटरवर लीक झाला आहे. ज्यामध्ये रश्मिका मंदाना मॉनिटर स्क्रीनवर दिसत आहे, तर व्हिडिओमध्ये सलमान खानची टीम शूटिंग साइटवर पोहोचताना दिसत आहे. दोन व्हिडिओ आहेत, एकात राजवाड्याचे दृश्य आहे, जिथे एक रोल्स रॉयस बाहेर उभी आहे. आणि त्याच्या शेजारी कॅनन ठेवलेला आहे. जे पाहून असं वाटतंय की कुठल्यातरी ॲक्शन सीनचा सीन आहे. तर, दुसऱ्याची कॅमेऱ्याच्या मागून एक झलक आहे.

रश्मिका मंदान्नासोबत सलमानचा रोमान्ससलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटात रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास करत असून सध्या त्याचे शूटिंग सुरू आहे. साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत.

 

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदाना