Join us  

Video: रुपेरी पडदा गाजवण्यासाठी Bunty aur Babli सज्ज; धमाकेदार टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 2:22 PM

Bunty aur Babli 2: तब्बल १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.नुकताच 'बंटी और बबली 2'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

ठळक मुद्देप्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी दिसून येत आहे.

 २००५ साली प्रदर्शित झालेला 'बंटी और बबली' हा चित्रपट त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji)मुख्य भूमिकेत झळकले होते. तसंच अमिताभ बच्चनदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता १६ वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरी कमी झालेली नाही. विशेष म्हणजे तब्बल १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.नुकताच 'बंटी और बबली 2'चा टीझर प्रदर्शित झाला असून या सिक्वलमध्ये यावेळी राणीसोबत अभिषेकऐवजी सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यशराज फिल्म्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून यात अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. 

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी दिसून येत आहे. यात दोन्ही जोड्यांपैकी सगळ्यात बेस्ट जोडी कोणती यावरुन या चौघांचा वाद रंगला आहे. मात्र, वादावर तोडगा न निघाल्यामुळे सैफ आणि राणी सेटवरुन जाताना दिसतात.विशेष म्हणजे या टीझरवरुन बंटी और बबलीच्या सिक्वलमध्ये हे चारही दिग्गज कलाकार झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

दरम्यान, येत्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता काही काळच वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटापूर्वी सैफ- राणीने 'हम तुम', 'तारा रम पम', 'थोडा प्यार थोडा मॅजिक' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :राणी मुखर्जीसैफ अली खान बॉलिवूडसिनेमा