Join us

Video Alert : ‘बिग बॉस’ची एक्स कंटेस्टेंट अली अवरामचा पहा बिकिनी अवतार !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:58 IST

एलीने इन्स्टाग्रामवर काही हॉट बिकिनी फोटो शेअर केलेत शिवाय सोलोमोशन व्हिडीओ शेअर करून एकच धूम उडवून दिली आहे.

बिग बॉस या वादग्रस्त शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. यावेळेस बिग बॉसच्या सातव्या सीजनची स्पर्धक एली अवराम चर्चेत असून, सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाचा चांगलाच डंका वाजत आहे. होय, सध्या एली ग्रीस येथे सुट्या एन्जॉय करीत असून, तेथील फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करीत आहे. एलीने नुकतेच तिच्या या व्हेकेशनचे काही बिकिनी फोटोज् शेअर केल्याने एली चांगलीच चर्चेत आली आहे. एलीने इन्स्टाग्रामवर काही हॉट बिकिनी फोटो शेअर केलेत शिवाय सोलोमोशन व्हिडीओ शेअर करून एकच धूम उडवून दिली आहे. निळ्या समुद्रात मस्ती करतानाचे एली फोटोमध्ये खूपच बिंधास्त दिसत आहे. लाल बिकिनीमध्ये असलेली एली खूप हॉट दिसत असल्याने या फोटोला नेटिझन्सकडून प्रचंड पसंती मिळत आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये बिकिनी घालून एलीने शेअर केलेला व्हिडीओ धूम उडवून देणारा आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून बिकिनीमधील फोटो शेअर करण्याचा जणू काही ट्रेंडच बनला आहे. कारण काही दिवसांपूर्वी मोनालिसा, बानी जे, लोपामुद्रा राऊत, करिष्मा शर्मा, शिवानी दांडेकर, कविता कौशिक यांनी बिकिनी फोटो शेअर करून धूम उडवून दिली होती. आता या यादीत एली अवराम हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. जेव्हा एली बिग बॉसच्या घरात होती, तेव्हा ती शोचा होस्ट सलमान खानची फेव्हरेट होती. सध्या ती बॉलिवूडमध्ये नशिब आजमावत असून, ‘मिकी वायरस’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. तिच्या अपोझिट मनीष पॉल बघावयास मिळाला होता. त्यानंतर ती ‘किस किस को प्यार करूॅँ’ आणि ‘नाम शबाना’मध्ये एक आयटम सॉँग करताना बघावयास मिळाली होती. एलीला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी, ती सातत्याने बिग बजेटच्या चित्रपटात झळकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी काळात एली एखाद्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटात झळकू शकते. कदाचित तिचे फोटो हीच हिंट देत असावेत.