Join us  

'भाग मिल्खा भाग'साठी रिजेक्ट झाला होता विकी कौशल, आज बनला आघाडीचा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 11:42 AM

तो आला त्यांने पाहिले त्यांने जिंकला असे काहीसे म्हणावे लागले अभिनेता विकी कौशलच्या बाबत. 'उरी' सिनेमाच्या यशानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले आहे

ठळक मुद्देमसान हा त्याच्यासाठी टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाहीत्याला त्याठिकाणी रिजेक्शनचा सामान करावा लागला होता

तो आला त्यांने पाहिले त्यांने जिंकला असे काहीसे म्हणावे लागले अभिनेता विकी कौशलच्या बाबत. 'उरी' सिनेमाच्या यशानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले आहे. विकीने 'लव शव ते चिकन खुराना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते मात्र त्याला ओळख मिळाली ती 'मसान' सिनेमातून. मसान हा त्याच्यासाठी टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. नुकतेच एका इंटरव्हु दरम्यान विकीने सांगितले की, स्ट्रगलच्या दिवसात त्यांने अनेक ठिकाणी ऑडिशन दिले होते मात्र त्याला त्याठिकाणी रिजेक्शनचा सामान करावा लागला होता. 

 फरहान अख्तरचा हिट सिनेमा 'भाग मिल्खा भाग'साठी देखील विकीने ऑडिशन दिले होते मात्र त्याला इथेही रिजेक्शनचा समाना करावा लागला होता. हा सिनेमा मिल्खा सिंग यांचा बायोपिक होता. त्यानंतर ही विकीने आपले प्रयत्न सुरुच ठेवले. आता त्याला उरीच्या निमित्ताने यशदेखील मिळाले.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'उरी'ने सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाहुबलीचा रेकॉर्डदेखील मोडला आहे. आता पर्यंत उरीने 188.55 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सिनेमाची घौडदौड अजून ही कायम आहे लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचले यात काही शंका नाही.  

सिनेमाच्या यशाबाबत बोलताना विकी म्हणाला ‘उरी’च्या यशानंतर माझा आत्मविश्वास वाढलाय. पण माझ्या स्वभावात कुठलाही बदल झालेला नाही. माझे अनेक मित्र आहेत, ज्यांच्यामुळे माझे पाय कायम जमिनीवर असतात. माझ्या वागण्याबोलण्यात जराही अहंकार डोकावला की, ते मला लगेच सावध करतात आणि मी लगेच स्वत:ला सांभाळतो.''

टॅग्स :विकी कौशलउरी