Join us

​ज्येष्ठ अभिनेत्री श्यामा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 20:16 IST

५० ते ६० च्या दशकात अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री श्यामा यांचे आज मंगळवारी सकाळी मुंबईत  निधन ...

५० ते ६० च्या दशकात अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री श्यामा यांचे आज मंगळवारी सकाळी मुंबईत  निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. दिवंगत सिनेमॅटोग्राफर फली मिस्त्री यांच्या पत्नी असलेल्या श्यामा त्यांच्यामागे दोन पुत्र आणि एक कन्या व बराच मोठा आप्त परिवार आहे. श्यामा यांचे खरे नाव खर्शीद अख्तर होते. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी खास चित्रपटांसाठी श्यामा हे नवे नाव दिले होते. श्यामा यांच्या पार्थिवावर दुपारी मरिन लाईन्स येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ४५ वर्षांपर्यंत त्यांनी सुमारे १७५ चित्रपटांत काम केले. गुरुदत्त यांच्या ‘आरपार’ या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्याावर पदार्पण केले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. सन १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात की रात’ आणि ‘आरपार’ या चित्रपटांनी त्यांना नवी ओळख दिली. ‘सावन भादो’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘मिलन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती.‘मिलन’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अभिनेते जॉनी वॉकर यांच्यासोबत त्यांनी ‘छू मंतर’, ‘आरपार’, ‘मुसाफिर खाना’, ‘खोटा पैसा’ आदी चित्रपटात काम केले होते. ‘जॉनी वॉकर’ या चित्रपटात  अभिनेते जॉनी वॉकर यांची नायिका म्हणूून त्या दिसल्या होत्या.  १९५३ मध्ये त्यांनी फली मिस्त्री यांच्यासोबत विवाह केला. १९७९ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर श्यामा दोन मुलांसोबत राहत होत्या.