Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 18:23 IST

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ...

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही त्यांची मुले आहेत. 
शशी कपूर यांना 2014 मध्ये फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत गेली. 
शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते.