Join us

इंडस्ट्रीतील ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याने रणवीर सिंगच्या एक, दोन नव्हे तर २४ वेळा लगावली कानशिलात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 14:17 IST

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, याच संदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ...

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, याच संदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक प्रसंग घडला असून, त्यात रणवीरची चांगलीच फजिती झाली. चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्याने शूटिंगदरम्यान रणवीरच्या एक, दोन नव्हे तर तब्बल २४ वेळा कानशिलात लगावली आहे. आहे ना धक्कादायक? पण थांबा... हे सर्व शूटिंगदरम्यान घडले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार ‘टेक’ घेताना घडला आहे. खरं तर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या परफेक्टनेससाठी ओळखले जाते. त्यातच ‘पद्मावती’सारखा भव्य चित्रपट बनवायचा म्हणजे त्यातील प्रत्येक सीन हा परफेक्ट असायलाच हवा. एका रिपोर्टनुसार, ‘चित्रपटातील एक सीन शूट केला जात होता. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांना रणवीर सिंगच्या गालावर जोरदार एक चापट मारायची होती. चापट या सीनमध्ये परफेक्शन आणण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी बºयाचदा टेक घेतले. त्यामुळे रजा मुरादसारख्या अभिनेत्याच्या भारीभक्कम हाताने रणवीरला २४ वेळा चापटा खाव्या लागल्या. ऐवढा मार खाल्यानंतर रणवीरची काय दशा झाली असेल याचा तुम्ही विचार करू शकता. होय, रणवीरचा गालच नव्हे तर त्याचा संपूर्ण चेहरा यामुळे लाल झाला होता. रणवीरने स्वत:च ट्विटर अकाउंटवर याविषयीची एक पोस्ट शेअर करून आपबिती सांगितली. यावेळी त्याने ज्या वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली, त्याचे कात्रण ट्विटमध्ये पोस्ट केले. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ट्रु स्टोरी’! दरम्यान, रजा मुराद, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण तिसºयांदा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करीत आहेत. कारण ‘पद्मावती’ अगोदर या कलाकारांनी ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर, दीपिका पादुकोण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.