Join us  

वीणा मलिकने भारतीय सैनिकांच्या विरोधात केलेल्या या ट्वीटमुळे लोकांनी तिला घेतले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 1:27 PM

भारतीय सरकारच्या विरोधात वीणा मलिकने एक ट्वीट केले असून तिने तिचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देएकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ज्यांना आज फिंगर दाखवत आहेस, त्यांनाच एकावेळेस तू मसाज देत होतीस. बॉलिवूडमध्ये तुला जो सन्मान मिळाला तो विसरली आहेस का असे देखील काही जणांनी तिला कमेंटद्वारे विचारले आहे.

बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असतो. या कार्यक्रमात येणारे स्पर्धक देखील अनेकवेळा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेच असतात. या कार्यक्रमाच्या एका सिझनमध्ये वीणा मलिक झळकली होती. या कार्यक्रमापासूनच वीणा मलिक हे नाव चर्चेत आहे. वीणा आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर केलेल्या एका ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या ट्वीटमुळे तिला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागल आहे. जम्मू-काश्मीरच्या सद्य स्थितीच्या संदर्भात भारतीय सेनेशी निगडित एक ट्वीट तिने केले आहे. तिला या ट्वीटमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

 

भारतीय सरकारच्या विरोधात वीणा मलिकने एक ट्वीट केले असून तिने तिचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत ती तिची मिडल फिंगर दाखवताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने काश्मीर आणि काश्मिरी लोकांवर होत असलेल्या अत्याचाराच्याबाबत लिहिले आहे. वीणाने हे ट्वीट केल्यानंतर तिला लोकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. या तिच्या पोस्टवर पाच हजाराहून अधिक लोकांनी कमेंट केले आहे. तिला लोक कमेंटद्वारे चांगलेच सुनावत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ज्यांना आज फिंगर दाखवत आहेस, त्यांनाच एकावेळेस तू मसाज देत होतीस. बॉलिवूडमध्ये तुला जो सन्मान मिळाला तो विसरली आहेस का असे देखील काही जणांनी तिला कमेंटद्वारे विचारले आहे.

 

बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये आपल्याला वीणा मलिकने हजेरी लावली होती. ती या कार्यक्रमातील तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहिली होती. तसेच या कार्यक्रमात असताना अभिनेता अश्मित पटेल आणि तिच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. या कार्यक्रमानंतर ती काही चित्रपटांमध्ये झळकली होती. वीणाने २०१३ मध्ये दुबईतील असाद बशिर खान या व्यवसायिकासोबत लग्न केले होते. एका वादात अडकल्यामुळे तिला आणि तिच्या पतीला कोर्टाने शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.  

 

टॅग्स :जम्मू-काश्मीरवीणा मलिकभारतीय जवानबिग बॉस