Join us

वरूण करणार आलिया-श्रद्धासोबत रोमान्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 10:33 IST

 सध्या नव्या पिढीचे कलाकार म्हणजेच वरूण धवन, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर हे खुप चांगला अभिनय करत आहेत. सर्वांत ...

 सध्या नव्या पिढीचे कलाकार म्हणजेच वरूण धवन, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर हे खुप चांगला अभिनय करत आहेत. सर्वांत आवडीच्या कलाकारांपैकी एक ते होत असल्याने त्यांना जास्त प्रोजेक्टही मिळत आहेत.ते तिघेही एकमेकांचे ‘बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर’ आहेत. नुकतेच कळालेय की, निर्माता साजिद नादियाडवाला याला आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांच्याबरोबर वरूणला घेऊन जुडवा २ करायचा होता.मध्यंतरी चर्चा होती की, आलिया-श्रद्धा मध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. पण नंतर कळाले की, त्यात काही तथ्य नाही. हे तिघे वेगवेगळ्या चित्रपटात अभिनयाने किती धम्माल उडवताहेत ? मग ते एकत्र आले तर काय होईल? ‘जुडवा २’ पाहिल्यावर ते कळेलच म्हणा....हो ना....!