वरूण घेतोय आलियाची काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:27 IST
लव्हबर्ड्स लिया भट्ट आणि वरूण धवन हे सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. ते दोघे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून सध्या एकमेकांसोबत फिरतांना जास्त दिसत आहेत. सिद्धार्थसोबतची आलियाची जवळीक कमी होऊन आता वरूण धवनसोबत ती जास्त क्लोज झाल्याचे कळतेय.
वरूण घेतोय आलियाची काळजी?
लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि वरूण धवन हे सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. ते दोघे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून सध्या एकमेकांसोबत फिरताना जास्त दिसत आहेत. सिद्धार्थसोबतची आलियाची जवळीक कमी होऊन आता वरूण धवनसोबत ती जास्त क्लोज झाल्याचे कळतेय.नुकतेच ते दोघे गोरखपूरला एका प्रमोशनल इव्हेंटसाठी जात होते. तेव्हा चाहत्यांची भली मोठी गर्दी जमा झाली. त्या गर्दीतून कसे जावे हे आलियाला कळत नव्हते. तेव्हा त्रासलेल्या आलियाला वरूणने स्वत:जवळ ओढले आणि तिला संरक्षण देत मार्ग काळत गेला. वेल, आलिया-वरूण तुम्ही एकमेकांच्या जवळ आला आहात आणि तुम्हाला एकत्र पाहणंच आम्हाला आवडतं ना...!