Join us

वरूण-दिलजीत येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 13:48 IST

पंजाबी सुपरस्टार आणि गायक दिलजीत दोसंघ याने ‘उडता पंजाब’ च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. करिना, शाहीद, आलिया, या तगड्या ...

पंजाबी सुपरस्टार आणि गायक दिलजीत दोसंघ याने ‘उडता पंजाब’ च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. करिना, शाहीद, आलिया, या तगड्या स्टारकास्टसोबत दिलजीतने आपला अभिनयही सिद्ध केला. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.तो यासाठी की, वरूण धवन-दिलजीत दोसंघ हे आता पुन्हा करण जोहर यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसतील. जानेवारीत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार अशी शक्यता आहे.वरूण सध्या ‘ढिशूम’ च्या रिलीज होण्याची वाट पाहतोय. त्या तो जॉन अब्राहम आणि जॅकलीन फर्नांडिससोबत दिसणार आहे. तसेच दिलजीत ‘फिलौरी’ मध्ये अनुष्का शर्मासोबत दिसणार आहे.