Join us

​वरूण धवनची ‘अक्टूबर’ गर्ल कोण कुठली? जाणून घ्या तिच्याबद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 10:38 IST

अखेर वरूण धवनच्या आगामी ‘अक्टूबर’ या सिनेमाला हिरोईन मिळाली. कालच आम्ही ही बातमी आपल्यासोबत शेअर केली होती. शुजीत सरकार ...

अखेर वरूण धवनच्या आगामी ‘अक्टूबर’ या सिनेमाला हिरोईन मिळाली. कालच आम्ही ही बातमी आपल्यासोबत शेअर केली होती. शुजीत सरकार दिग्दर्शित ‘अक्टूबर’चे शूटींग लवकरच सुरु होतेय. काल वरूणने tweet करून या चित्रपटाला हिरोईन मिळाल्याची माहिती दिली होती. ‘जिचा मी शोध चालवला होता, ती हीच आहे,’असे  tweet वरूणने केले होते. या tweetसोबत एक फोटोही शेअर केला होता. अर्थात या फोटोत वरूणच्या हिरोईनचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता. पण आता वरूणच्या या हिरोईनबद्दल आम्ही सगळी माहिती घेऊन आलो आहोत. होय, ती कोण कुठली, अशी सगळी माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत.वरूणच्या या हिरोईनचे नाव आहे, बनिता संधू. होय, बनिताचे वय केवळ १८ वर्षे आहे. एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते.  पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. यू ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही. वरूणने स्वत: सुजीत सरकारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.   शुजीत ‘अक्टूबर’या चित्रपटावर काम करत असल्याचे कळताच  वरूण त्यांना भेटायला गेला होता.  ALSO READ : ‘अक्टूबर’साठी वरूण धवनला मिळाली हिरोईन!‘अक्टूबर’ या  चित्रपटाचीदेखील इतर चित्रपटांप्रमाणे वेगळी आणि हटके कथा आहे. वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा शुजीत यांना सुचली होती. शुजीत यांनी सांगितले की, आम्ही ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत होतो. तेव्हा अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने माझे लक्ष वेधले आणि माझ्या चित्रपटाला एक कथा मिळाली. हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल.