अक्टूबर’ या चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत सरकार ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल. यानंतर वरूण अनुष्का शर्मासोबत स्क्रिनवर रोमांस करताना दिसणार आहे. सुई धागा या चित्रपटात वरुणच्या अपोझिट अनुष्का दिसणार आहे.
ALSO READ : हॉलिवूड अभिनेत्रीने विचारले, ‘आपण एकत्र चित्रपट केव्हा करणार?’ वरुण धवनने दिले मजेशीर उत्तर!
याचित्रपटातून बनिता संधू एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. यू ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही.