Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरूण धवनचे ‘बीट पे बुट्टी’ न्यू व्हर्जन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 12:56 IST

‘बीट पे बुट्टी चॅलेंज कम्प्लिटेड बाय युअर स्टुडंट्स मी अ‍ॅण्ड पुनीत पाठक़ बेस्ट आॅफ लक गाईज...’

 रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटातील ‘बीट पे बुट्टी’ हे गाणे सध्या चर्चेत आहे. टायगर आणि जॅकलीनच्या चाहत्यांसोबतच ‘बी टाऊन’ च्या सेलिब्रिटींनाही या गाण्याचे वेड लागले आहे.आता वरूण धवननेही ‘बीट पे बुट्टी’ या गाण्याचे न्यू व्हर्जन काढून त्यावर अप्रतिम डान्स केला आहे. या गाण्यावर सनी लिओनी हिनेही डान्स केला आहे. हेच चॅलेंज घेत आता वरूणननेही ‘बीट पे बुट्टी’ वर डान्स केला आहे.हा व्हिडीओ त्यानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून कॅप्शन दिले आहे की,‘ बीट पे बुट्टी चॅलेंज कम्प्लिटेड बाय युअर स्टुडंट्स मी अ‍ॅण्ड पुनीत पाठक़ बेस्ट आॅफ लक गाईज...’