Join us  

Video: IPL मॅचच्या ग्राऊंड स्टाफवर भडकला वरुण धवन; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 3:11 PM

परवाच्या मुंबई विरुद्ध गुजरात IPL मॅचदरम्यान एक कुत्रा मैदानात धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला

क्रिकेटचा सामना सुरु असताना स्टेडियममध्ये अनेक घटना घडतात ज्या व्हायरल होतात. एखादा चाहता सुरक्षारक्षकांची नजर चुकवत थेट मैदानात येते, खेळाडूंच्या पाया पडतो या गोष्टी आपण पाहिल्यात. परवाच्या मुंबई विरुद्ध गुजरात IPL मॅचदरम्यान एक कुत्रा मैदानात धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र या कुत्र्याला ज्या पद्धतीने हाकलवण्यात आलं ते वरुण धवनला (Varun Dhawan)  अजिबात पटलेलं नाही. त्यामुळेच त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

भटका कुत्रा मैदानात आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी अनेकजण त्याच्या मागे धावताना दिसत आहेत. कोणी मध्येच त्याला अडवण्याचाही प्रयत्न करत आहे. गर्दीमुळे तो कुत्रा आणखी सैरभैर झाल्याचं स्पष्ट दिसून येतंय. दरम्यान काही जण त्याला पकडण्याच्या प्रयत्नात अक्षरश: पाय मार मारत आहेत. याच गोष्टीवर वरुण धवन भडकला आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. तो लिहितो,'किती वाईट. तो कुत्रा काही फु़टबॉल नाही ज्यापद्धतीने तुम्ही त्याला लाथाडत आहात. तो कुणाला चावत नव्हता ना काही हानी पोहचवत होता. दुसऱ्या पर्यायाने त्याला बाहेर काढण्यात आलं असतं.'

वरुण धवनकडे सुद्धा एक पाळीव कुत्रा आहे. अनेकदा तो त्याच्या pet सोबत फोटो शेअर करत असतो. सध्या कुत्र्यांना माणसांकडून त्रास देण्याच्या घटना वाढल्या आहेत. याविरोधात वेळोवेळी अनेक सेलिब्रिटी आवाज उठवताना दिसतात. आता तर आयपीएल मॅचदरम्यानच असा व्हिडिओ समोर आल्याने अनेकांनी यावर टीका केली आहे. 

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडआयपीएल २०२४कुत्रासोशल मीडिया