Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरुण धवन आणि नीतू कपूर कोरोना पॉझिटीव्ह? 'जुग जुग जियो' सिनेमाचे शूटिंग थांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 16:57 IST

‘जुग जुग जिओ’सिनेमाच्या टीममधील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.

चंदिगडमध्ये शूटिंग करत असलेल्या ‘जुग जुग जिओ’सिनेमाच्या टीममधील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. या सिनेमातील मुख्य कलाकार वरुण धवन आणि नीतू कपूर यांना कोविड -19 झाल्याचे समोर आलंय. अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.  दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार गुरुवारी संध्याकाळी या दोनही कलाकारांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला आहे.

सिनेमाचे शूटिंग थांबवलेरिपोर्टनुसार, सिनेमाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. आज संध्याकाळपर्यंत सिनेमाच्या टीमकडून याबाबत अधिकृत निवेदन येण्याची शक्यता आहे.  अलीकडेच अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओलही हिमाचल प्रदेशात सुट्टीवर गेलेले असताना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते. त्यांना तिथे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.  

ऋषी कपूरला यांचे निधन होवून जवळपास 6 महिने झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर पहिल्यांदाच कामावर परतल्या आहेत. सिनेमाचे शूटिंग  सुरू करण्यापूर्वी नीतू कपूर यांना ऋषी कपूर यांची आठवण झाली. राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे.आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अनिल कपूर आणि नीतू कपूर यांची जोडी रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे चित्रपटात कियारा आणि वरुण धवन यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :वरूण धवनकियारा अडवाणी