ALSO READ : ‘या’ चित्रपटात जमणार वरूण धवन -अनुष्का शर्माची जोडी!
काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये वरूण व आलिया भट्ट हे दोघे आले होते. यावेळी तुझ्याकडे काय नाही? असा प्रश्न करणने वरूणला विचारला होता. या प्रश्नावर वरूणने आलियाकडे बघितले होते. मध्यंतरी वरूण व आलिया दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्याही चर्चेत होत्या. अर्थात आलिया सिद्धार्थ मल्होत्राच्या प्रेमात बुडाल्याचे कानोकानी झाल्यावर वरूण व तिच्या डेटींगच्या चर्चा आल्या तशा विरल्यात. त्यानंतर अचानक वरूण व नताशा यांच्या नात्याची चर्चा व्हायला लागली.
आता वरूण व नताशा हा दोघांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला म्हटल्यावर,यापेक्षा आनंदाची बातमी कुठली असेल. वरूण सध्या ‘जुडवा2’ या सिनेमात बिझी आहे. या चित्रपटात तो जॅकलिन फर्नांडिस व तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. वरूणचा हा चित्रपट १९९७ साली आलेल्या ‘जुडवा’चा सीक्वल आहे.