वरुण झाला भावनिक....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:37 IST
आपला भाऊ रोहितने दिग्दर्शित केलेल्या ‘ढिशूम’ या चित्रपटादरम्यान आपण खूपच भावनात्मक झाल्याचे अभिनेता वरुण धवनने म्हटले आहे. या चित्रपटात ...
वरुण झाला भावनिक....
आपला भाऊ रोहितने दिग्दर्शित केलेल्या ‘ढिशूम’ या चित्रपटादरम्यान आपण खूपच भावनात्मक झाल्याचे अभिनेता वरुण धवनने म्हटले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि जॅकलिन फर्नांडीस हे देखील आहेत. रोहितने यापूर्वी अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांना घेऊन देसी बॉईज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.‘माझ्यासाठी अगदी खरोखर भावनिक होते. माझा भाऊ आणि जॉन हे माझ्या आयुष्यातील हिरो आहेत. मला अजूनही आठवतं जेव्हा देसी बॉईज प्रदर्शित झाला होता, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे पाहण्यासाठी मी थिएटरला गेलो होतो’ असे वरुण म्हणाला.‘त्याच्या वेडेपणातून हा चित्रपट तयार झाला, याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही जे पडद्यावर पाहताय, ते त्याचेच श्रेय आहे,’ असे रोहितने सांगितले. या चित्रपटात वरुण हा अरब अमिरातीमधील पोलीस बनला आहे. उच्चार योग्य पद्धतीचे असावेत यासाठी वरुण अरबी शिकला.‘मी अरब अमिरातीमधील अबु धाबी येथील पोलीस अधिकारी झालोय. त्यासाठी मी अरबीही शिकलो. त्या ठिकाणचे पोलीस कसे बोलतात याचा मी अभ्यास केला. मुंबई पोलिसांपेक्षा ते वेगळे असल्याचे वरुणने सांगितले.