Join us

‘एबीसीडी ३’ मध्ये वरूण-जॅकलीन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 14:02 IST

 वरूण धवनने ‘एबीसीडी २’ मध्ये काम केले आणि सर्वांना उत्सुकता लागली की आता चित्रपटाचा तिसरा भाग केव्हा येणार तो? ...

 वरूण धवनने ‘एबीसीडी २’ मध्ये काम केले आणि सर्वांना उत्सुकता लागली की आता चित्रपटाचा तिसरा भाग केव्हा येणार तो? वेल, आता वरूणच्या चाहत्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण, ‘एबीसीडी’ चा तिसरा भाग आता वरूण आणि जॅकलीन यांच्यासह येणार असल्याचे कळते आहे.‘ढिशूम’ च्या  स्क्रिनिंगसाठी ‘एबीसीडी २’ चे दिग्दर्शक रेमा डिसूजा हे देखील आले होते. त्यावेळी जॅकलीन,वरूण, रेमो यांनी मिळून फोटोसेशन केले. यावेळी वरूणला विचारले असता तो म्हणाला,‘ अद्याप असं काही मला कळाले नाहीये. पण, मला रेमो सरांसोबत काम करायला नेहमीच आवडते. मी तर म्हणेन की, मला पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. ‘एबीसीडी ३’ येणार की नाही? आणि रेमो सर त्याचे दिग्दर्शन करणार ? हे देखील कळेलच लवकर.’