Join us

वरूण-आलिया करणार ‘तम्मा तम्मा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 12:36 IST

आता हीच जोडी ‘बद्रिनाथ की दुल्हनियॉ’ मध्ये बप्पी लहिरींनी संगीतबद्ध केलेले ‘तम्मा तम्मा’ हे गाणे नव्या रूपात सादर करणार आहेत. १९९० च्या राज एन.सिप्पी दिग्दर्शित ‘थानेदार’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते.

‘बॉलिवूडचा चॉकलेट बॉय’ वरूण धवन आणि ‘चुलबुली गर्ल’ आलिया भट्ट ही जोडी ‘बी टाऊन’ ची सर्वांत हॉट जोड्यांपैकी एक समजली जाते. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ चित्रपटात त्यांनी ‘समझावा’ हे रोमँटिक गाणे साकारले होते. आता हीच जोडी ‘बद्रिनाथ की दुल्हनियॉ’ मध्ये बप्पी लहिरींनी संगीतबद्ध  केलेले ‘तम्मा तम्मा’ हे गाणे नव्या रूपात सादर करणार आहेत. १९९० च्या राज एन.सिप्पी दिग्दर्शित ‘थानेदार’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. संगीतकार तनिष बागची या नव्या गाण्याबद्दल बोलताना म्हणाले,‘आम्ही बप्पी लहरी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील गाणे ऐकले. त्या गाण्याला नवा तडका देण्यासाठी रॅपर बादशाहच्या आवाजाचा आधार घेतला आहे.  हे गाणे एक पेपी डान्स नंबर असून तरूणाईला आवडण्यासारखे आहे. हे दोघे मुंबईतच कोरिओग्राफर बॉस्कोसोबत हे गाणं या आठवड्यात शूट करणार आहेत. ’ वरूण-आलिया यांनी मे महिन्याअगोदर मुंबईतील शूटिंग संपवणे अपेक्षित आहे. त्यानंतरचे शूटिंग झांशी, कोटा आणि सिंगापूर येथे होणार आहे. ‘कमांडो २’ मध्ये विद्युत जामवाल, फ्रेडी दारूवाला, इशा गुप्ता आणि अदाह शर्मा यांच्यावर ‘तम्मा तम्मा’ हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. वरूण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी प्रेक्षकांमध्येही सर्वांत फेव्हरेट जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल असतात. आता वरूण-आलियाचे  हे नवे पेपी गाणे प्रेक्षकांना किती आवडतेय हे लवकरच कळेल. ">http://