Join us  

'वास्तव'मधील फॅक्चर बंड्या होता नेव्ही ऑफिसर; अभिनयासाठी सोडलं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 7:07 PM

Vaastav fracture bandya :राजस्थानमधील शिमला गावी जन्म झालेला जॅक इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत होता. मात्र, अभिनयाच्या ओढीमुळे त्याने ही नोकरी सोडली आणि बॉलिवूडची वाट धरली.

ठळक मुद्देफॅक्चर बंड्याची भूमिका अभिनेता जॅक गॉड याने वठविली होती.

अभिनेता संजय दत्तच्या कारकिर्दीतील वास्तव हा चित्रपट विसरणं कोणत्याही प्रेक्षकाला शक्य नाही. एका सामान्य कुटुंबातील मुलाचा गँगस्टर होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात अत्यंत सुंदररित्या मांडण्यात आला आहे. एकीकडे मध्यवर्गीय कुटुंब, त्यांची स्वप्न आणि दुसरीकडे इच्छा नसतानाही गुंडगिरीच्या दलदलित फसत चाललेला मुलगा याचं उत्तम चित्रण या चित्रपटात पाहायला मिळालं. संजय दत्त, रिमा लागू, शिवाजी साटम, नम्रता शिरोडकर आणि संजय नार्वेकर या कलाकारांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. परंतु, याच कलाकारांसोबत एक भूमिका अत्यंत गाजली. ती म्हणजे फॅक्चर बंड्याची. अभिनेता जॅक गॉड Jack Gaud याने ती भूमिका वठविली होती. विशेष म्हणजे या अभिनेत्याविषयी अनेकांना माहितीच  नाही. त्यामुळे जॅक गॉड नेमका कोण होता ते जाणून घेऊयात.

८० ते ९० चा काळ गाजवणाऱ्या जॅक गॉडने त्याच्या कारकिर्दीमुळे खलनायिका भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. परंतु, त्याला खरी ओळख मिळाली ती वास्तव चित्रपटातून. उंच धिप्पाड शरीरयष्टी असलेला जॅक अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन कलाविश्वात आला होता. मात्र, त्याच्या निगेटिव्ह भूमिका गाजल्यामुळे कलाविश्वात त्याची व्हिलन हीच प्रतिमा तयार झाली. विशेष म्हणजे अभिनेता होण्यासाठी जॅकने त्याची इंडियन नेव्हीमधील नोकरीदेखील सोडली.

अनिल कपूरने केला होता न्यूड सीन; २० वर्षांनंतर सांगितला 'तो' अनुभव 

१९५८ मध्ये राजस्थानमधील शिमला गावी जन्म झालेला जॅक इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत होता. मात्र, अभिनयाच्या ओढीमुळे त्याने ही नोकरी सोडली आणि बॉलिवूडची वाट धरली. जॅकच्या घरातील अनेक व्यक्ती इंडियन नेव्हीमध्ये होते. त्यामुळे त्यालादेखील नाइलाजास्तोवर इंडियन नेव्ही जॉइन करावी लागली. परंतु, त्याच्यातील अभिनयाचा कीडा त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळेच १९७७ मध्ये लागलेली इंडियन नेव्हीची नोकरी त्यांनी ८० च्या दशकाच्या सुरुवातीला सोडली.

'गंगूबाई काठियावाडी'सह, 'RRR' आणि 'अ‍टॅक' चित्रपटगृहांमध्येच होणार रिलीज 

दरम्यान, नोकरी सोडल्यानंतर १९८४ मध्ये त्याने इंसाफ कौन करेगा या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटातच धर्मेंद्र आणि रजनीकांत मुख्य भूमिकेत झळकले होते. तर जॅक यांनी छोटेखानी एका गुंडाची भूमिका वठवली होती. त्यानंतर त्यांचा कलाविश्वातील प्रवास हळूहळू सुरु झाला. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसंजय दत्त