Join us

यूजर्सनी म्हटले, ‘पॅडमॅन चॅलेंज’ म्हणजे ट्विंकल खन्नाचा ढोंगीपणा; ट्विंकलने दिले जशास तसे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 20:44 IST

अक्षयकुमार स्टारर ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या ‘पॅडमॅन चॅलेंज’ हा फंडा आजमाविला जात आहे. मात्र या चॅलेंजवरून निर्माती ट्विंकल ...

अक्षयकुमार स्टारर ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या ‘पॅडमॅन चॅलेंज’ हा फंडा आजमाविला जात आहे. मात्र या चॅलेंजवरून निर्माती ट्विंकल खन्नाला ट्रोल केले जात आहे. ट्विंटर यूजर्सनी ट्विंकलवर चित्रपटाचे प्रमोशन चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचा आरोप करताना तिला ढोंगी असे म्हटले आहे. ट्विंकलनेही टीकाकारांना जशास तसे उत्तर दिले आहे. सध्या ट्विंकल व्यतिरिक्त बरेचसे बॉलिवूड स्टार ‘पॅडमॅन चॅलेंज’ करताना दिसत आहेत. आमिर खान, शबाना आजमी, सोनम कपूर, आलिया भट्ट, अनिल कपूर यांच्यासह अनेक कलाकार हे चॅलेंज करताना बघावयास मिळाले. महिलांच्या मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान, हे कॅम्पेन रिअल पॅडमॅन ए. मुरुगनाथम यांच्या एका पोस्टनंतर सुरू झाले. त्यांनी एक सॅनिटरी नॅपकिन हातात पकडून एक फोटो पोस्ट केला होता. ज्यावर एक संदेश लिहिला होता. ‘होय, माझ्या हातात एक सॅनिटरी पॅड आहे अन् यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही नाही.’ यावेळी मुरुगनाथम यांनी ट्विंकल खन्ना, अक्षयकुमार, राधिका आपटे यांना या चॅलेंजसाठी नॉमिनेट केले होते. त्यानंतर अक्षयकुमार, सोनम कपूर, राधिका आपटे आणि ट्विंकलने ‘पॅडमॅन चॅलेंज’ या हॅशटॅगने हे कॅम्पेन सुरू केले. ट्विंकलने गेल्या शुक्रवारी सॅनिटरी नॅपकिन हातात पकडून ट्विटरवर तिचा एक फोटो शेअर केला. या पोस्टनंतर ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. ट्विटर यूजर्सनी तिच्यावर चुकीच्या पद्धतीने प्रमोशन करीत असल्याचा आरोप केला. 

This is an epic example of how celebrities can do anything to promote their Film. Where were you ma'am ? Why this so called awareness only before your own produced movie ? Hypocrisy at its best form.

— Palash Chatterjee (@Palash87) February 2, 2018

ट्विंकलच्या या पोस्टवर एका यूजरने तर तिला हा ढोंगीपणा असल्याचे म्हटले. यूजरने लिहिले की, ‘सेलिब्रेटी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. तू या चित्रपटाची निर्मिती केल्यामुळेच याविषयीचे जनजागृतीपर अभियान राबवित आहेस, हा ढोंगीपणा नाही का?’ या ट्विटनंतर ट्विंकलचा असा काही संताप झाला की, तिने त्यास जशास तसे उत्तर दिले. या ट्विंटला रिप्लाय देताना ट्विंकलने लिहिले की, ‘२०१५ मध्येच मी माझ्या कॉलममध्ये या माहमारीबद्दल लिहिण्यास सुरुवात केली होती. २०१६ मध्ये एका पुस्तकात (रिअल पॅडमॅन) ए. मुरगनाथम यांच्याबद्दल लिहिले. त्यानंतर २०१८ मध्ये ‘पॅडमॅन’ या चित्रपटाची निर्मिती केली. हे त्या लोकांसाठी आहे जे याकडे अजूनही नकारात्मकपणे बघत आहेत.’