Join us  

HOTNESS ALERT! उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर शेअर केला बोल्ड व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 2:29 PM

उर्वशीच्या बोल्ड व्हिडीओची चर्चा...

ठळक मुद्दे‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला.

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. नाही म्हणायला तिला चित्रपट मिळतात, पण या चित्रपटातील तिचे बोल्ड सीन्स तेवढेच चर्चेत राहतात. नुकताच तिचा ‘पागलपंती’ हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटात उर्वशीला घेतलेच का? असा प्रश्न हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना पडला. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली. पण तूर्तास उर्वशीच्या एका बोल्ड व्हिडीओची चर्चा होतेय. होय, उर्वशीने स्वत: हा बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्वशी ‘ठुमका’ गाण्यावर थिरकताना दिसतेय. काहीच तासांत या व्हिडीओला 16 लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत.

उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.

‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली.  भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. 

टॅग्स :उर्वशी रौतेला