Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बोल्ड डान्स मूव्जसाठी उर्वशी रौतेलाने केले ‘हे’ काम !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 10:15 IST

काही दिवसांपूर्वी ‘हेट स्टोरी4’चे ‘आशिक बनाया आपने’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्यात उर्वशी रौतेला अतिशय बोल्ड अवतारात दिसतेय. गाण्यातील उर्वशीचे डान्स मूव्ज तर जबरदस्त आहेत. अर्थात या डान्स मूव्ह सोपी गोष्ट नव्हती.

काही दिवसांपूर्वी ‘हेट स्टोरी4’चे ‘आशिक बनाया आपने’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्यात उर्वशी रौतेला अतिशय बोल्ड अवतारात दिसतेय.  गाण्यातील उर्वशीचे डान्स मूव्ज तर जबरदस्त आहेत. अर्थात या डान्स मूव्ह सोपी गोष्ट नव्हती. होय, या एका गाण्यासाठी उर्वशीला ब-याच गोष्टी शिकाव्या लागल्यात. या गाण्यासाठी उर्वशीला बराच घाम गाळावा लागला. होय, बॅक डान्सर्ससोबत ताळमेळ जमावा, यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.  कारण हे बॅक डान्सर्स प्रोफेशनल होते. त्यांना खास लंडनवरून बोलवण्यात आले होते.एवढे कमी की काय म्हणून या गाण्यासाठी पोल डान्सही शिकावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी एक उत्तम डान्सर आहे. मात्र पोल डान्समध्ये ती परफेक्ट नव्हती. प्रोफेशनल बॅक डान्सर्सइतके परफेक्शन आणणे त्यामुळे कठीण होते. अखेर उर्वशीने यासाठी पोल डान्स शिकला आणि अतिशय मेहनतीने हे गाणे पूर्ण केले.



‘हेट स्टोरी4’ हा चित्रपट येत्या ९ मार्चला रिलीज होतोय. विशाल पांड्या दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता करण वाही   लीड रोलमध्ये आहे. याशिवाय एक नवा चेहराही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  पंजाबी अभिनेत्री इहाना ढिल्लन या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. सूरज पांचोली आणि गुरमीत चौधरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

ALSO READ : Hate Story 4 Trailer : उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अंदाजाची पाहा झलक!

‘हेट स्टोरी’ बॉक्सआॅफिसवर एक हिट फ्रेंचाइजी आहे. सस्पेन्स, थ्रील आणि बोल्डनेस असा सगळा मसाला असल्यामुळे ही फ्रेंचाइजी इतकी हिट ठरलीय. ही फ्रेंचाइजी इरोटिक कन्टेन्टसाठी ओळखली जाते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘हेट स्टोरी’ने याची सुरुवात झाली होती. यात अभिनेत्री पाऊली डॅम मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर आलेल्या ‘हेट स्टोरी2’मध्ये सुरवीन चावला फिमेल लीडमध्ये होती. तर ‘हेट स्टोरी3’मध्ये जरीन खानने लीड भूमिका साकारली होती.  ‘हेट स्टोरी4’ मध्ये ही जागा उर्वशीने घेतली आहे.