Join us  

क्रिकेटपटू ऋषभ पंतशी लग्न करणार अभिनेत्री उर्वशी रौतेला ? म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 10:28 AM

अभिनेत्री उर्वशी रौतेला क्रिकेटपटू ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाला नेहमीच भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या नावाने चिडवलं जातं. मीडिया असो किंवा चाहते सगळेच तिला पाहताच ऋषभच्या नावाचा घोष करताना दिसतात. अनेकदा चाहते उर्वशीच्या पोस्टचा ऋषभ पंतशी संबंध जोडतात.  पुन्हा एकदा उर्वशी आणि  ऋषभ पंत यांची नावे चर्चेत आली आहेत.  नुकतेच एका मुलाखतीमध्ये उर्वशीनं ऋषभ पंतशी लग्न करणार का यावर उत्तर दिलं आहे.  जाणून घ्या क्रिकेटरशी लग्न करण्याबद्दल अभिनेत्री काय म्हणाली आहे.

नुकतेच उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबतच्या लग्नावर Filmygyan ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. ऋषभ पंत तुझा खूप आदर करतो, तो तुला आनंदी ठेवेल, तू त्याच्याशी लग्न केलं तर आम्हाला आनंद होईल, अशी एका चाहत्याची कमेंट होती. यावर उर्वशीला तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली. दोन शब्दात उत्तर देत उर्वशी म्हणाली, 'नो कमेंट्स'. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तिची प्रतिक्रिया चांगलीच चर्चत आली आहे. 

उर्वशी आणि ऋषभ पंत एकमेकांना डेट करत होते. पण काही कारणास्तव ते वेगळे झाले.  दोघांनीही एकमेकांची नावं न घेता बऱ्याच पोस्ट टाकल्या होत्या. त्यांचा सोशल मीडियावरील शाब्दिक वाद खूप चर्चेत राहिला होता. मात्र, पंतने अनेकदा उर्वशीला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. सध्या उर्वशी आणि ऋषभ यांच्यात कोणतही नातं नसलं, तरीही फक्त सोशल मीडिया पोस्टमुळे दोघे चर्चेत असतात.  उर्वशी कायम सोशल मीडियावर अशा पोस्ट करत असते, ज्यामुळे चाहते तिची पोस्ट ऋषभ पंत याच्यासोबत कनेक्ट करतात. 

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, अभिनेत्री लवकरच बॉबी देओल, दुलकर सलमान, नंदामुरी बालकृष्णासोबत 'NBK109' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती सनी देओल आणि संजय दत्तसोबत 'बाप' चित्रपटात दिसणार आहे. तसेच उर्वशीचा 'जेएनयू' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले आहे.  हा चित्रपट ५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उर्वशी रौतेलाशिवाय रवी किशन, रश्मी देसाई, सिद्धार्थ बोडके, पियुष मिश्रा, विजय राज, सोनाली सहगल यांसारखे स्टार्सही या चित्रपटात दिसणार आहेत.

टॅग्स :उर्वशी रौतेलासेलिब्रिटीबॉलिवूडरिषभ पंत