Join us

​उर्वशीने केली अक्षय कुमारशी तुलना; म्हणे मी अक्षयची फिमेल व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:06 IST

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे स्टार सध्या चांगलेच झळकत आहे. सलमान खानने उर्वशीच्या डोक्यावर हात ठेवल्याने ती चांगलीच उत्साहित आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे स्टार सध्या चांगलेच झळकत आहे. सलमान खानने उर्वशीच्या डोक्यावर हात ठेवल्याने ती चांगलीच उत्साहित आहे. याच उत्साहाच्या भरात तिने स्वत:ची तुलना अक्षय कुमारशी केली आहे. उर्वशीच्या मते, ती अभिनेता अक्षय कुमारची फिमेल व्हर्जन आहे. उर्वशी रौतेला सध्या ‘गल बन गयी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या एका गाण्याचे शूटिंग संपविले आहे. या गाण्याचा अनुभव शेअर करताना उर्वशी म्हणाली, हे गाणे करणे माझ्यासाठी कठीण काम होते. यासाठी मला मार्शल आर्टपासून ते तायक्वाँदो शिकावे लागले. मला या दोन्ही कला शिकायच्या होत्या. या गाण्याच्या निमित्ताने मला ते शिकता आले. मी यात खरोखरची अ‍ॅक्शन केली आहे, म्हणून मी बॉलिवूडमधील अक्षयची फिमेल व्हर्जन आहे. सनम रे व ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटातील नायिका असलेल्या उर्वशीचे नाव नुकतेच सलमान खानशी जोेडण्यात आले होते. सलमानने उर्वशीच्या करिअरची जबाबदारी स्वीकारली आहे अशा बातम्या येत होत्या. हे कुठपर्यंत खरे आहे याबाबत सध्यातरी कुणालाच माहिती नाही. उर्वशीने मॉडेलिंगनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने ‘मिस टीन इंडिया’ हा खिताब मिळविला असून, मिस एशिअन सुपर मॉडेल हा खिताबही तिने आपल्या नावे केला आहे. ‘अक्षय कुमारशी तुलना करताना उर्वशी मात्र एक गोष्ट विसरली ती म्हणजे अक्षय कुमार सिनेमात येण्यासाठी मार्शल आर्ट शिकला नाही तर त्याने मार्शल आर्टसाठी बरीच वर्षे मेहनत केली आहे. आता एका चित्रपटासाठी थोडेफार धडे घेतलेल्या उर्वशीने आपली तुलना अक्षय कुमारशी करावी हे तर तिचा आगामी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.