Join us  

उर्मिला मातोंडकर कंगणावर बरसली, नुसती घाण परवण्याची काय गरज आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:49 PM

कंगणाला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली गेली त्याचा खर्च हा तुमच्या आमच्या सारख्या माणसाच्या खिशातून दिला जातोय. मुळात कंगणा महाराष्ट्रात आलीच कशाला ? हिमाचलमध्येही बसून ती तमाशा करू शकली असती.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेला घराणेशाहीचा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. यावर कलाकार मंडळी पुढे येत आपलs विचार मांडत आहेत. रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरनेही याबाबत सांगताना म्हटले की, बॉलिवूडमध्ये घराणेशाही किंवा नेपोटेझिम हे आज आलेलं नाही. पूर्वापार चालत आलेले आहे. आम्हीही नेपोटीझमला सामोरे गेलो आहोत. फक्त फरक हा होता की, आम्हीही बोलायचो पण त्यावेळी आमचा आवाज पोहचवण्यासाठी आजच्या सारखे सशक्त माध्यम नव्हते. मी नम्रता दाखवली.आज सोशल मीडियामुळे हा मुद्दा खूप गाजतोय.

नेपोटीझम बाबात बोलायला मी ही बोलेन पण त्यावेळी अनेकांची मनंही दुखावली जातात. सुशांत नंतर मी ट्वीट केले तेव्हा 'नेपोटीझम' हा शब्द मी वापरला होता. या दुःखद घटनेचा आज तमाशा बनवून टाकला आहे. सुंदर व्यक्तीमत्व, लाघवी असे व्यक्तीमत्व होता सुशांत. मात्र मुळ मुद्दा भरकटतोय असे मला वाटते. सुशांतच्या कुटंबाला न्याय मिळतोय का? रिया चक्रवर्तीवर एतकी चौकशी केली जाते आतापर्यंत ठोस निर्णय झाला नाही. 

त्यानंतर कंगणा पुराण सुरू झाले. मुंबईने तिला पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा सगळं काही मिळवून दिले. इंडस्ट्रीने तिला भरभरून दिले त्याच इंडस्ट्रीला ती दिवसभर शिव्या देते. काही निवडक लोकांमुळे अख्खी इंडस्ट्री कशी वाईट असू शकते. कंगणा जे काही बडबडते ते कोणत्याही नॉर्मल व्यक्तीला पटण्यासारखे नाहीत. आपल्याला ठरवायचे असते की कशा पद्धतीने बोलले जावे.अक्षय- शाहरूख असे कलाकारही बाहेरूनच आलेले आहेत. या लोकांना कोणतेच अभिनयचा बॅकग्राऊंड नव्हते. तरीही आज ते सुपरस्टार आहेत. 

बॉलिवूडमध्ये नेपोटीझम आहे हे नाकारून चालणार नाही. मात्र दरवेळी काहीतरी वायफळ बोलून घाण पसरवणे गरजेचे नाही . माझ्या करिअरच्या सुरूवातीला मराठी मुलगी असल्यामुळे मलाही 'घाटी' बोलले जायचे. म्हणून मी त्या गोष्टीचा तमाशा करत बसली नाही. कंगणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावे हे आपणच आपल्याला ठरवणे गरजेचे आहे. 

कंगणाला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली गेली त्याचा खर्च हा तुमच्या आमच्या सारख्या माणसाच्या खिशातून दिला जातोय. मुळात कंगणा महाराष्ट्रात आलीच कशाला ? हिमाचलमध्येही बसून ती तमाशा करू शकली असती. कंगणाचे ऑफिस तोडणं हे नक्कीच चुकीचं आहे या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. जे चुकीचे आहे ते चुकीचे, जे बरोबर आहे ते बरोबरच हेच मला समजतं. झाँसीच्या राणीवर सिनेमा कोणीही काढेल हो, म्हणून झाँसी की राणी होत नाही ना. महाराष्ट्रासाठी काय केलंय कंगणाने. तिने फार चिंता न करता हिमाचलच काही तरी कंगणाने करायला हवं. 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकंगना राणौत