Join us

​ बेधडक मीरा राजपूतने केला, सेक्स लाईफबद्दल खुलासा! काय? वाचाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 12:03 IST

शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांची जोडी बॉलिवूडच्या सुंदर जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्याही लग्नाला दोन वर्षे झालीत. अनेक ...

शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांची जोडी बॉलिवूडच्या सुंदर जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्याही लग्नाला दोन वर्षे झालीत. अनेक मुलींच्या हृदयावर राज्य करणा-या शाहिदने दिल्लीत राहणा-या आणि बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नसणा-या एका सिंपल मुलीसोबत लग्न करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.मीरा शाहिदपेक्षा वयाने १३ वर्षे लहान आहे आणि हा दोघांचेही अरेंज मॅरेज होते. मीरा कोण आहे, कुठून आलीय, तिचे नेचर काय, असे कुणालाच माहित नव्हते. लग्नानंतर मीरा कधीच मीडियाशी बोलली नव्हती. खरे तर मीराबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सूक होते. अखेर करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये चाहत्यांना ही संधी मिळाली. करणने शाहिद व मीराला एकत्र आपल्या शोमध्ये येण्यास राजी केले. या शोमध्ये मीराने जे ही काही सांगितले ते सगळे धक्कादायक होते. होय, मीरा या शोमध्ये अगदी बेधडक बोलली होती. इतकी की, तिने शाहिदसोबतच्या सेक्स रिलेशनबद्दलही खुलासा केला होता. करणच्या एका प्रश्नाला उत्तर देताना, आम्ही कारमध्ये सेक्स केले होते, असे मीराने सांगितले होते आणि हे सांगताना लाजून लाजून चूर झाली होती. यानंतर शाहिदनेही असाच एक खुलासा केला होता. मी कधी कधी नेकेड झोपतो, असे त्याने सांगितले होते. यावर मीराही बोलली होती. होय हे खरे आहे. खरे म्हणजे नेकेड झोपतांना तू खूप कंफर्टेबल असतो, असे ती शाहिदला उद्देशून ती म्हणाली होती. शाहिदसोबतचे तुझे लग्न तुटलेच तर त्याचे काय कारण असू शकेल? असा प्रश्न करणने मीराला केला होता. यावर मीराने अगदी प्रामाणिक उत्तर दिले होते. सासरचे आमच्या आयुष्यात दखत देत नाही. आम्ही दोघांची सेक्स लाईफही चांगली आहे. काही कंटाळवाणे नाहीय. त्यामुळे आमचे लग्न तुटलेच तर त्याचा केवळ एकच कारण असू शकते ते म्हणजे, चीटिंग, असे मीरा म्हणाली होती.