Join us

ट्विंकलच्या मुलीनेच केला तिचा विनोद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 21:24 IST

तीन वर्षाच्या वयातच ट्विंकल खन्नाची मुलगी ‘नितारा’ ही तिचाच  विनोद करायला लागली आहे. स्वत: ट्विंकलनेच ही आपबिती सांगितली. आपल्यालाही हे वाचून नक्कीच ...

तीन वर्षाच्या वयातच ट्विंकल खन्नाची मुलगी ‘नितारा’ ही तिचाच  विनोद करायला लागली आहे. स्वत: ट्विंकलनेच ही आपबिती सांगितली. आपल्यालाही हे वाचून नक्कीच हसू आल्याशिवाय राहणार नाही. ‘ट्विंकल ट्विंकल अगर तुम एक लिटिल स्टार हो तो आसमान में क्यों नहीं रहती’? अशी आईवर तिने कविता म्हटली आहे. ट्विंकलने ट्विटवर हे सर्व शेअर केले आहे. नितारा ही ट्विंकल व अक्षयची दुसरी मुलगी आहे. २५ डिसेंबर २०१२ मध्ये तिचा जन्म झाला.त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव ‘आरव’ असून, तो १४ वर्षाचा आहे. त्याला अक्षयसारखाच मार्शल आर्टस्मध्ये इंटरेस्ट आहे.