Join us

ट्विंकलने गुपचूप घेतला ‘या’ बाबाचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 12:29 IST

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी  ट्विंकल खन्ना तिच्या जबरदस्त सेन्स आॅफ ह्युमरसाठी ओळखली जाते. लेखिका अशीही ...

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी  ट्विंकल खन्ना तिच्या जबरदस्त सेन्स आॅफ ह्युमरसाठी ओळखली जाते. लेखिका अशीही तिची ओळख आहे.  ट्विंकल  एक इंटिरियर डिझाईनरही आहे. आता ती आणखी एका नव्या भूमिकेत दिसते आहे. होय,  ट्विंकल आता फोटोग्राफर बनली आहे.  ट्विंकलने अशा बाबाचा फोटो घेतला की, तो पाहून तुम्हीही चाट पडाल. होय,  ट्विंकलला एक नवा शेजारी लाभला आहे.  ट्विंकलने या नव्या शेजा-याचा गुपचूप फोटो घेतला अन् तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो कुणाचा ? तर एका बाबाचा. होय, डेरा सच्चा सौदाचे प्रमुख आणि ‘दी मेसेंजर’ या चित्रपटाचे लीड अ‍ॅक्टर बाबा गुरमीत राम रहिम सिंह. बाबा राम रहिम  ट्विंकलच्या शेजारी राहायला आले आहेत. ट्विंकलने त्याचा चोरून फोटो घेतला आणि णका मजेशीर कॅप्शनसह तो twitterवर शेअर केला.  ट्विंकल व अक्षय जुहू चौपाटीसमोरील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. या इमारतीच्या तिस-या माळ्यावर हृतिक रोशनही राहतो.  चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाही याच बिल्डींगमध्ये राहतात.‘दी मेसेंजर’ आणि ‘एमएसजी २’च्या यशानंतर ‘लायन हर्ट’ या चित्रपटात बाबा राम रहीम यांनी मुख्य भूमिकेत दिसले होते. शिवाय लेखक, दिग्दर्शक, संवाद लेखक, वेशभूषा, प्रॉपर्टी डिझायनर, पार्श्वगायक यासह वीएफक्सची धुराही त्यांनी सांभाळली होती. या चित्रपटात बाबा राम रहीम क्रू प्रवृत्तींशी लढताना दिसले होते. यावेळी त्यांचा लढण्याचा अंदाज मात्र वेगळा होता. बाबा राम रहीम यांच्या ‘लायन हट चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील कमाईत नवा विक्रम केला होता. या चित्रपटाने ४०० कोटींच्यावर कमाई केली होती.