Join us

CoronaVirus : ट्विंकल खन्नाने 2015 मध्येच केली होती या संकटाची भविष्यवाणी, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 15:17 IST

वाचून व्हाल हैराण

ठळक मुद्देबॉलिवूडला अलविदा केल्यानंतर ट्विंकलने लिखाणावर  भर दिला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झालेय. अख्खा देश, देशातील प्रत्येक नागरिक दहशतीत आहेत. लोक आपआपल्या घरात कैद आहेत.  कोरोनाच्या दहशतीने अख्खाच्या अख्खा देश लॉकडाऊन आहे. विमानतळे, बाजारपेठा बंद आहेत. अनेक लोक मृत्युशी झुंज देत आहेत. पण तूर्तास बातमी जरा वेगळी आहे. होय, बातमी आहे अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने वर्तवलेल्या एका भविष्यवाणीसंदर्भातील.ऐकून आश्चर्य वाटेल पण आज देशात कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याची भविष्यवाणी ट्विंकलने 2015 सालीच केली होती.होय, ट्विंकलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून तुम्हीही हैराण व्हाल. या पोस्टमध्ये ट्विंकलने या भविष्यवाणीबद्दल लिहिले आहे. आज देशात जी परिस्थिती आहे, त्याबद्दल मी 2015 मध्येच लिहिले होते, असा दावा ट्विंकलने केला आहे. सोबत 2015 साली लिहिलेल्या संबंधित स्क्रिप्टचा एक फोटोही शेअर केला आहे.

ट्विंकलने पोस्टमध्ये काय केली होती भविष्यवाणी...ही एक रफ स्टोरी आयडिया होती. ही स्क्रिप्ट लिहून मी एडिटर चिकी सरकार आणि जगरनॉट डॉट इन यांना दाखवली होती. मात्र त्यात ह्युमर नसल्याच कारण देत त्यांनी ती नाकारली होती. पण आता  आता कोण हसत आहे? असे  ट्विंकलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पोस्टमध्ये ट्विंकलने 2015 मध्ये तिने लिहिलेल्या स्क्रिप्टचा फोटोही शेअर केला आहे. या स्क्रिप्टमध्ये ट्विंकलने जे लिहिलेय, ते आज तंतोतंत होताना दिसतेय. बॅक्टेरियाचा हल्ल्यानंतर अख्या देश क्वारंटाइन आहे. विमानतळे बदं आहे. आर्मी प्रत्येक घराची झडती घेतलेय, शेजारी संसर्ग झालेल्या लोकांबद्दल माहिती देत आहे. संसर्ग झालेल्यांना कॅम्पमध्ये नेले जात आहे....असे ट्विंकलने लिहिले आहे. आज कोरोना व्हायरसने जगावर हल्ला केला असताना नेमकी हीच स्थिती पाहायला मिळतेय.

बॉलिवूडला अलविदा केल्यानंतर ट्विंकलने लिखाणावर  भर दिला आहे. आपले विचार स्पष्टपणे मांडणाऱ्या लेखकांपैकी ट्विंकल एक आहे. तिची काही पुस्तक देशातील 'बेस्ट सेलर' देखील आहेत.

टॅग्स :ट्विंकल खन्नाकोरोना वायरस बातम्या