Join us  

ट्विंकल खन्नाने लेकाकडे मागितला पासवर्ड, त्यावर आरव म्हणाला-मॉम, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 10:17 AM

ट्विंकल खन्ना अनेकदा तिच्या आयुष्याविषयी, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी, कुटुंबीयांविषयी रंजक किस्से शेअर करत असते.

ट्विंकल आणि अक्षय यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. ते दोघेही आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. आरव परदेशात शिक्षण घेतोय. अलिकडेच आरवने त्याचा २१ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. आता अभिनेत्रीने मुलाला घेऊन एक खुलासा केला आहे. 

अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केल्यापासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर झाली. पण एक प्रसिद्ध लेखिका म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्विंकल खन्ना अनेकदा तिच्या आयुष्याविषयी, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी, कुटुंबीयांविषयी रंजक किस्से शेअर करते.

ट्विंकल खन्नाने सांगितले की तिने  हेल्थ इन्श्युरन्स एजंटशी संपर्क करत मुलांच्या हेल्थ चेकअपचा  रेकॉर्ड मागितला. यावर  हेल्थ इन्श्युरन्स एजंट ट्विंकलला म्हणाला, नितारा लहान असल्याने तिचे रेकॉर्ड पालकांसोबत शेअर केले जाऊ शकतात. पण आरवबाबत सांगू शकत नाही, कारण तो आता मोठा झाला आहे, त्याला त्याच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवण्याचा पूर्ण हक्क आहे. ही गोष्ट अभिनेत्रीला फारशी काही पटली नाही, तिने लेकाला फोन करत पासवर्ड मागितला. तो देण्यास आरवने नकार दिला. 

तो ट्विंकलला म्हणाला, “मॉम, मी संपूर्ण वर्षात फक्त चार वेळाच डॉक्टरकडे गेलोय. तुला त्याबद्दल संपूर्ण माहिती आहे कारण, त्या चारही वेळा माझ्यासोबत डॉक्टरकडे येण्याचा हट्ट तू केला होतास. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मात्र मी माझा पासवर्ड देणार नाही. कारण आता मी 21 वर्षांचा आहे, 12 नाही. मी माझ्या गोष्टी स्वत: हाताळू शकतो.”

ट्विंकलने झालेला संपूर्ण प्रकार पती अक्षय कुमारला सांगितला. अक्षयने आणि आई डिंपल कपाडियाने ट्विंकलला समजावण्याचा  प्रयत्न केला. अक्षय ट्विंकलला म्हणाला, आरव मोठा झालाय. सध्या निताराला तुझी गरज आहे. तू तिच्याकडे लक्ष दे.''

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमार