Join us

तुषार कपूर बनला बाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 14:06 IST

तुषार कपूर बाप बनला हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. तुषारचे लग्न झालेले नसले तरी तो एका मुलाचा ...

तुषार कपूर बाप बनला हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. तुषारचे लग्न झालेले नसले तरी तो एका मुलाचा बाप बनला आहे. आयव्हीएफ टेक्नॉलॉजी आणि सरोगसी मदरच्या साहाय्याने तो एका मुलाचा पिता बनला आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलाचा जन्म झाला. त्याच्या मुलाचे नाव त्याने लक्ष्य असे ठेवण्यात आले आहे. तुषारच्या या बाळाच्या आगमनाने त्याचे वडील अभिनेते जितेंद्र खूप खूश आहेत. तुषारच्या आयव्हीएफच्या आणि सिंगल पॅरेंटिंगच्या निर्णयात आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत. नातवंडाच्या आगमनाने आम्ही सगळे आनंदित झालो आहोत असे त्यांनी सांगितले. तुषार गेली नऊ महिने जसलोकमध्ये येत असून तो त्याच्या बाळाच्या प्रत्येक वाढीकडे बारकाईने लक्ष देत होता असे जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.