Join us

​‘ट्युबलाईट’ टीम ‘लई जोरात’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 20:21 IST

कबीर खान व सलमान खान ही जोडी ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिसºयांदा एकत्र आली आहे. या जोडीचे ‘एक था ...

कबीर खान व सलमान खान ही जोडी ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिसºयांदा एकत्र आली आहे. या जोडीचे ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ हे आधीचे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरल्याने निश्चितपणे प्रेक्षक ‘ट्युबलाईट’ची आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. पंधरा दिवसांआधी लडाखमध्ये ‘ट्युबलाईट’चे शूटींग सुरु  झाले आणि नियोजित आराखड्याच्या एक दिवसाआधीच ते संपलेही. आता शूटींग शेड्यूल एक दिवसाआधीच संपले म्हटल्यावर लडाखमध्ये धम्माल-मज्जा तर बनतेच. मग काय, ‘ट्युबलाईट’ च्या अख्ख्या टीमने मस्तपैकी बाईक राईड आणि नदीकाठच्या जेवणाचा प्लॅन बनवला. कबीरने या धम्माल-मस्तीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकंदर काय तर ‘ट्युबलाईट’ ची अख्खी टीम ‘लई जोरात’ आहे, हेच यावरून दिसते.}}}}