Join us

​‘ट्यूबलाइट’ आहे हॉलिवूडची कॉपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 18:42 IST

सलमान खानचा आगामी व बहुचर्चित चित्रपट ‘ट्यूबलाइट’चे कथानक हे एका हॉलिवूड चित्रपटाची कॉपी असल्याचे समजते.  चित्रपटात १९६२ च्या इंडो-सिनो ...

सलमान खानचा आगामी व बहुचर्चित चित्रपट ‘ट्यूबलाइट’चे कथानक हे एका हॉलिवूड चित्रपटाची कॉपी असल्याचे समजते.  चित्रपटात १९६२ च्या इंडो-सिनो वॉरच्या देखील काही बॅकड्रॉप आहेत. हा चित्रपट २०१५ मधील हॉलिवूडच्या ‘लिटिल बॉय’ चित्रपटाचा रिमेक आहे. या दोन्ही सिनेमामध्ये फक्त एकच फरक आहे की 'लिटिल बॉय' मध्ये एका पित्याची आणि मुलाची कथा आहे तक 'ट्यूबलाईट'मध्ये दोन भावांची कथा आहे. 'लिटिल बॉय' हा एक फँटसी सिनेमा आहे. जो वर्ल्ड वॉर 2 वर आधारित आहे.