Join us

गणेश विसर्जनाच्यावेळी सलमान खानने चक्क केले धुम्रपान, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 14:23 IST

सलमान धुम्रपान करत असतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून हा व्हिडिओ गणेश विसर्जनामधीलच असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओमुळे सलमानवर प्रचंड टीका केली जात असून सोशल मीडियावर त्याला चांगलेच सुनावले जात आहे. ट्विटरद्वारे लोकांनी नायक नही खलनायक हूँ में, शेम ऑन यु मि. सलमान खान असे म्हणत त्याला ट्रोल केले आहे. 

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले होते. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्या घरीही दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली आणि त्याचे विसर्जन देखील झाले.

‘दबंग 3’च्या शूटींगमधून वेळ काढून सलमान बाप्पाच्या दर्शनासाठी आला. संपूर्ण कुटुंबासोबत त्याने गणरायाची पूजाअर्चना केली.  बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मोठी आरती करण्यात आली. यावेळी सलमान खान बहीण अर्पिताचा मुलगा अहिल याच्या सोबत गणपतीची आरती करताना दिसून आला. बाप्पाच्या विसर्जनावेळी देखील भाईजान मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. ढोल ताशांच्या तालावर तो चांगलाच थिरकला. कधी स्वरा भास्कर तर कधी डेजी शाहसोबत त्याने ठेका धरला. याचे डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण त्याचसोबत सलमानचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सलमान धुम्रपान करत असतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून हा व्हिडिओ गणेश विसर्जनामधीलच असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमुळे सलमानवर प्रचंड टीका केली जात असून सोशल मीडियावर त्याला चांगलेच सुनावले जात आहे. ट्विटरद्वारे लोकांनी नायक नही खलनायक हूँ में, शेम ऑन यु मि. सलमान खान असे म्हणत त्याला ट्रोल केले आहे. 

दबंग या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात सलमानने साकारलेली चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. या चित्रपटाची सगळीच गाणी चांगलीच गाजली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील संवाद देखील लोकांच्या तोंडपाठ झाले होते. या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा आणि सलमानच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती. दबंग आणि दबंग 2 या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता दबंग 3 प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे जोरदार चित्रण सध्या सुरू असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात देखील त्याची जोडी सोनाक्षी सिन्हासोबत जमणार आहे. 

टॅग्स :सलमान खानगणेशोत्सव