TROLL : कोणी पॅराशूट, तर कोणी छत्री बनवून उडविली ऐश्वर्या रायच्या ड्रेसची खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 17:04 IST
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१७’मध्ये सहभागी झालेल्या ऐश्वर्या राय-बच्चनची एंट्री खूपच लक्षवेधी ठरली. ऐश्वर्याने परिधान केलेल्या सिंड्रेला ड्रेसमध्ये ती एखाद्या ...
TROLL : कोणी पॅराशूट, तर कोणी छत्री बनवून उडविली ऐश्वर्या रायच्या ड्रेसची खिल्ली!
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१७’मध्ये सहभागी झालेल्या ऐश्वर्या राय-बच्चनची एंट्री खूपच लक्षवेधी ठरली. ऐश्वर्याने परिधान केलेल्या सिंड्रेला ड्रेसमध्ये ती एखाद्या प्रिन्सेससारखी दिसत होती. मात्र अशातही तिचा हा लुक नेटिझन्सना फारसा पचनी पडला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणी पॅराशूट, तर कोणी छत्री बनवून ऐश्वर्याच्या ड्रेसची खिल्ली उडविली आहे. सोशल मीडियावर तिला आजही ट्रोल केले जात असल्याने प्रियंका चोपडाने परिधान केलेल्या महाकाय गाउनचीच आठवण होत आहे. कान्समध्ये ऐश्वर्या ब्लू बॉलरूम गाउन घालून रेड कार्पेटवर उतरली होती. या गाउनमध्ये तिचे सौंदर्य जबरदस्त खुलले होते. ती एखाद्या प्रिन्सेससारखी दिसत होती. तिच्या कान्स लुकवर भारतीय फॅन्स अक्षरश: फिदा झाले होते. मात्र काही फॅन्स मात्र वेगळ्याच धुंदीत दिसून आलेत. त्यांनी काही तरी हटके करण्याचा उपद्व्याप केला. कोणी बीचवरील छत्री, तर कोणी पॅराशूट बनवून तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले. खरं तर सोशल मीडियावर अशाप्रकारचे सेलिब्रिटींचे फोटोज् व्हायरल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटींचे फोटोज् एडिट करून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. काही दिवसांपूर्वीच प्रियंका चोपडाच्या महाकाय गाउनवरून अशाप्रकारचे फोटोज् माध्यमांमध्ये शेअर करण्यात आले होते. आता याचा सामना ऐश्वर्यालाही करावा लागला.