Join us

इम्तियाज देणार भावी निर्मात्यांना प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:40 IST

चित्रपट निर्माते इम्तियाज अली हे भावी निर्मात्यांना प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी ते 'स्पॉटलाईट' या डिजिटल मंचावरून प्रतिभावंतांना संधी उपलब्ध ...

चित्रपट निर्माते इम्तियाज अली हे भावी निर्मात्यांना प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी ते 'स्पॉटलाईट' या डिजिटल मंचावरून प्रतिभावंतांना संधी उपलब्ध करून देणार आहेत. यात 'नेक्स जीटीव्ही' या अँपच्या माध्यमातून इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. याद्वारे व्हिडिओ तयार करून ते अपलोड करता येतील. निवडक व्हिडिओंना 'स्पॉटलाईट'मध्ये प्रसिद्धी दिली जाईेल. इम्तियाज हे दर महिन्याला यातील पाच व्हिडिओंचे परीक्षण करून त्यातील एकाला एक लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर करतील. व्हिडिओचे कथा ते संगीत असे विविध पैलू बघितले जातील. त्यातही कथानक, ते सांगण्याची पद्धत, सादरीकरण याला अधिक महत्त्व दिले जाईल. इच्छूक या अँपवर स्वत:चे खाते उघडून सहभागी होऊ शकतात. पुढे त्यांना आपले व्हिडिओ अपलोड करता येतील.