Join us

‘तुम बिन २’चा ट्रेलर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 13:12 IST

‘तुम बिन २’ चे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. हा चित्रपटही तुम बिन प्रमाणे हिट होणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला. प्रियांशु चॅटर्जी, संदाली सिन्हा, हिमांशू मलिक आणि राकेश वसिष्ठ हे सर्व नवीन कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत होते. नवीन चेहºयांसोबत चित्रपट साकारण्याचे आव्हान या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने पेलले. ‘तुम बिन’ चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट झाला आणि आता त्याचा सिक्वेल ‘तुम बिन २’चा ट्रेलर आऊट झालाय. या ट्रेलरमध्ये नेहा शर्मा, आदित्य सील आणि आशिम गुलाटी यांच्या प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. ‘तुम बिन’ प्रमाणेच ‘तुम बिन २’ चेही संगीत अतिशय श्रवणीय आहे. ‘तुम बिन २’ चे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. हा चित्रपटही तुम बिन प्रमाणे हिट होणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. ">http://