Join us

TRAILER OUT: राज रिबूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 14:11 IST

बहुचर्चित हॉरर चित्रपट सिरीज ‘राज’मधील चौथा चित्रपट ‘राज रिबूट’चे ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाले आहे.

बहुचर्चित हॉरर चित्रपट सिरीज ‘राज’मधील चौथा चित्रपट ‘राज रिबूट’चे ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाले आहे. इम्रान हाश्मी, गौरव अरोडा आणि नव अभिनेत्री क्रिती खरबंदा अशी स्टार कास्ट या चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक विक्रम भटने ट्विटरवर माहिती दिली की, ‘पहिल्या ‘राज’ चित्रपटानंतर  १४ वर्षांनी आज चौथ्या भागाचे ट्रेलर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.’ बिपाशा बसू, डिनो मोरिया आणि आशुतोष राणा अभिनित पहिल्या ‘राज’ चित्रपटाने त्याकाळी हॉरर चित्रपटांची क्रेझ आणली होती.रोमानिया येथील कडाक्याच्या थंडीमध्ये या चित्रपटाची शुटिंग झाले आहे. ‘गुपितं (राज, सिक्रेट्स) प्रेमाचे सर्वात मोेठे शत्रू असतात’ असे जेव्हा क्रिती म्हणते तेव्हा या चित्रपटाची एकंदर थीम लक्षात येते.लवकरच चित्रपटातील ‘लो मान लिया’ हे गाणंदेखील रिलीज करण्यात येणार आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.