Join us

​ trailer out : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’चा ट्रेलर असा तर चित्रपट कसा असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:41 IST

अखेर राणी मुखर्जीची कमबॅक फिल्म ‘हिचकी’चा ट्रेलर आज रिलीज झाला. २०१४ मध्ये आलेला ‘मर्दानी’ हा राणीचा अखेरचा चित्रपट होता. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘हिचकी’द्वारे राणी पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली आहे.

अखेर राणी मुखर्जीची कमबॅक फिल्म ‘हिचकी’चा ट्रेलर आज रिलीज झाला. २०१४ मध्ये आलेला ‘मर्दानी’ हा राणीचा अखेरचा चित्रपट होता. ‘मर्दानी’नंतर  चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘हिचकी’द्वारे राणी पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली आहे.   ‘हिचकी’च्या ट्रेलरबद्दल सांगायचे तर, यात राणीने टॉरेट सिंड्रोमने पीडित असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे. यात व्यक्तिला सतत उचकी लागते. त्यामुळे ‘हिचकी’च्या ट्रेलरमध्येही राणी अनेकदा ‘हिचकी’ घेताना दिसते. या ‘हिचकी’मुळे ती अनेकदा आपले म्हणणे पूर्ण करू शकत नाही. तिला टीचर बनायचे असते. यासाठी ती अनेक मुलाखती देते. पण तिचा वाणी दोष तिच्या या स्वप्नाच्या आड येतो. पण म्हणतात ना, प्रयत्नांनी परमेश्वर. एक शाळा तिला नोकरी देते. या शाळेत काही खोडकर मुलांसोबत तिची गाठ पडते. ही मुले राणीला त्रासवून सोडतात. तिच्या ‘हिचकी’वरून तिना नाही नाही ते बोलतात. पण ही मुले आज ना उद्या नक्की सुधारणार, हा विश्वास राणीला असतो. राणीने यात नैना माथूर नामक महिलेचे पात्र साकारले आहे. ‘हिचकी’चा ट्रेलर अनेकदा तुम्हाला भावूक करून सोडतो.नव्या वर्षांत २३ फेबु्रवारीला ‘हिचकी’ रिलीज होतो आहे. त्याआधी येत्या २२ डिसेंबरला रिलीज होऊ घातलेल्या ‘टायगर जिंदा है’सोबत ‘हिचकी’चा ट्रेलर पे्रक्षक पाहू शकतील.ALSO READ : ​ २२ वर्षांपासून ‘या’ समस्येशी लढतेयं राणी मुखर्जी! कुणालाही नव्हती खबर!!राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमा सिद्धार्थ पी मल्होत्राने दिग्दर्शित केला आहे. गत आॅक्टोबरमध्ये राणीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले होते. २०१४ मध्ये राणीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. सन १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार यश मिळवू शकला नाही. पण यातील राणीच्या अभिनयाने पे्रक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.२१ एप्रिल २०१४ रोजी राणीने पॅरिसमध्ये दिग्दर्शक व निमार्ता आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केले होते. ९ डिसेंबर २०१५ रोजी राणीने आदिराला जन्म दिला होता.